देशातील ताज ग्रुपचे सर्व हॉटेल एकाच नावाखाली

 Taj Mahal Hotel
देशातील ताज ग्रुपचे सर्व हॉटेल एकाच नावाखाली

ताज हॉटेल - 100 वर्षांहून आपल्या विविधतेचा आणि संस्कृतीचा वारसा जपणारी भारतातील सर्व ताज हॉटेलेस आता एकाच नावाने ओळखली जाणार आहेत. भारतात ताज ग्रुपचे 101 हॉटेल्स 64 ठिकाणी आहेत. हे सर्व हॉटेल्स यापुढे 'ताज हॉटेल्स पॅलेस रिसॉर्ट्स सफारी' या एका नावाच्या ब्रँड खाली ओळखले जाणार असल्याची घोषणा गुरुवारी गेट वे ऑफ इंडिया येथील द ताज हॉटेलमध्ये द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने केली.

ताज हॉटेल्स, ताज पॅलेस, ताज रिसॉर्ट आणि ताज सफारी यामध्ये अंतर्गत बदल करण्यात आला आहे. 'ताज'ने नव्याने घोषित केलेला हा ब्रँड सर्वच 'ताज'शी संबधित लोकांना आवडेल. तसंच 'ताज'चा एक नवीन लोगो तयार केला आहे. हे सर्व ताजचे सर्वेसर्वा जमशेदजी टाटा यांच्या नजरेतून बदल करत आहोत. या ग्रुपमधील सर्व हॉटेलचे नूतनीकरणाचा अनुभव ताजला भेट देणाऱ्या पाहुण्यांना येत्या डिसेंबर 2017 पर्यंत अनुभवायला मिळेल, असं ताजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक राकेश सरणा यांनी म्हटले.

Loading Comments