Advertisement

मंदिरात विराजमान त्रिदेवी !


मंदिरात विराजमान त्रिदेवी !
SHARES

सोमवार बाजार - मालाड पश्चिम स्थित सोमवार बाजारातील पाटलादेवीचे मंदिर स्थानिक लोकांचे ग्रामदैवत आहे. पाटलादेवीची ही मूर्ती अडीच ते सव्वातीन फूट उंचीची असून तिच्यावर पितळी पत्रा चढवण्यात आला आहे. देवीच्या डाव्या बाजूस खोकलादेवी आणि त्याच्या बाजूलाच शितलादेवी अशा एकूण तीन देवींच्या पूर्वाभिमूख मूर्ती आहेत. पाटलादेवीची मूर्ती चतुर्भुज असून देवीच्या वर आणि मंदिरावर दोन छत्र आहेत. प्रांगणात २ दगडी दिपमाळाही आहेत.

मंदिर आवारातच हनुमान, शंकर आणि श्रीरामाचे मंदिर आहे. पाटलादेवी मंदिरात शारदीय, चैत्र नवरात्रौत्सव आणि मार्गशीर्ष महिन्यात जत्रेचे स्वरुप प्राप्त झालेले पाहायला मिळते. अनेक समाजोपयोगी कार्य आणि उपक्रम मालाड मंदिर ट्रस्टमार्फत राबवले जातात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा