रांगोळीतून साकारलेली वास्तविकता

  मुंबई  -  

  जोगेश्वरी - एखाद्या आर्ट गॅलरीतील पेंटिंग्स वाटतायेत ना ? पण थांबा. ही पेंटिंग्स नाहीत तर रांगोळ्या आहेत. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू का? असं म्हणणारी आर्ची, सुंदरता फक्त एक कल्पना आहे हे सांगणारी अॅसिड हल्ल्यातील तरूणी, स्त्रीचा दुर्गा अवतार दर्शवणारं हे चित्र, नो मिन्स नो सांगणारी स्त्री, अन्नाची नासाडी आणि भूकबळी यातील मांडलेली वास्तवता, नाना पाटेकरांमधील हुबेहुब टिपलेला नटसम्राट. वाह. सुरेख. खरच ही दृश्य पाहून तुमच्या तोंडूनही हेच शब्द निघतील. या चित्रांवरून नजरच हटणार नाही तुमची. एवढच काय तर शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवाजी महाराजांची कूटनिती कशी सर्जिकल स्ट्राईकची स्फूर्ती ठरली ते सांगणारी रांगोळी, आई हाक मारायला इथून पुढे मी नसेन हे सांगणारा हुतात्मा. अगदी सामान्यांपासून ते सुप्रसिद्ध कलाकारांपर्यंत प्रत्येकांचे टिपलेले हावभाव खरच बोलके आहेत.

  रांगोळ्याचं हे प्रदर्शन जोगेश्वरीतल्या बांद्रेकरवाडी परिसरातील श्री समर्थ विद्यालयात भरवण्यात आलंय. संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही या प्रदर्शनाला भेट देऊ शकता. रंगावली परिवारानं याचं आयोजन केलं आहे. 61 रांगोळ्यांचा नजराना प्रदर्शनामध्ये रसिकांना पाहायला मिळणाराय. तर पाच तारखेला संध्याकाळी कवितेचं आयोजन ही करण्यात आलं आहे. आठवणीतल्या जुन्या नव्या जाणकार कवींच्या कविता या कार्यक्रमात सादर करण्यात येणाराय. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.