म्यूरल 'पॉवपॉव' प्रदर्शनात

BDD Chawl
म्यूरल 'पॉवपॉव' प्रदर्शनात
म्यूरल 'पॉवपॉव' प्रदर्शनात
See all
मुंबई  -  

वरळी- वरळीयेथील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या निलेश इंगळे या विद्यार्थ्यांची 'म्यूरल'ची रचना पॉवपॉव प्रदर्शनात प्रदर्शीत झालीय. जे.जे स्कूल ऑफ आर्टस् च्या 23 विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलाकृतीचे प्रदर्शन चित्रकार अनिल नाईक यांनी 'पॉवपॉव' या शिर्षकाखाली जहाँगिर आर्टमध्ये भरवलंय. यात वरळीमध्ये राहणाऱ्या निलेश इंगळेचे दि रेड पॅच नावाचे म्यूलर ठेवण्यात आले. या म्यूरलचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधला हिटलर आणि व्हॅन गॉग आणि त्यांच्या गन्सला पाहिले कि असं वाटत की त्यांना स्वत: शिवाय कुणी मारू शकत नाही. तर एकीकडे नेपोलियन तर दुसरीकडे जग्गजेता सिंकदर तर मध्यभागी सुंदरतेचे प्रतिक असलेली मार्लिन कुठल्यातरी पुस्तकात रममान झालेली दिसते. या सगळ्या गोष्टी जरी भुतकाळातल्या वाटत असल्या तरी त्या सर्वव्यक्ती त्यांनी स्वत:वर तानलेल्या बंदुका जणू स्वत:च्या प्रश्नाला वाचा फोडत असल्याचे जाणवते. दरम्यान म्यूरल आणि शिल्पकला ही माझी हौस असल्याचे निलेशनं सांगितलंय. तसेच कलाक्षेत्रात ऑइल पेंटींग हे आपलं वेगळपण असल्याचेही त्यानं यावेळी सांगितलंय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.