Advertisement

'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो'


'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो'
SHARES

मुंबई - दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. बलिप्रतिपदेला भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा करतात. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते. पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.
प्रचलित कथेनुसार बळी हा असूर राजा होता. त्याला त्याच्या सामर्थ्याचा खूप गर्व झाला होता. त्याला अहंकाराबद्दल शिक्षा देण्यासाठीच भगवान विष्णूनं वामन अवतार घेऊन त्याला पाताळलोकी पाठवलं. काही जण वामनावतारानं गर्वहरण केलेल्या बळीला शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणतात. पण ते चुकीचं आहे. शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणजे खुद्द श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम हा आहे. त्याची आयुधंही शेतकऱ्यांचा नांगर आणि मुसळ हीच आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा