निरोगी आरोग्यासाठी 'बल्ले बल्ले'

  मुंबई  -  

  वांद्रे - रुटीन आणि कंटाळवाण्या एक्झरसाइजला पर्याय म्हणून अनेक नवे व्यायामाचे प्रकार यायला लागले आहेत. फिटनेस ट्रेनिंग म्हणून याकडे अनेकजण वळलेत. डांसिंग हा प्रकार व्यायाम म्हणून केला जाऊ लागलाय. झुंबा, एरोबिक्स सारख्या व्यायाम प्रकारात हा व्यायाम मोडतो. देशातच नाही तर परदेशातही यातला एक प्रकार सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे मसाला भांगडा. मसाला भांगडा म्हणजे पंजाबी स्टाइल भांगडा आणि हिंदी चित्रपटाची नृत्यशैली यांचा मिलाफ आहे. पंजाबी ठेक्यावर नाचून कॅलरी घटवणारा हा प्रकार पाश्चिमात्य देशातही गर्दी खेचतो आहे. या वेगळ्या व्यायामप्रकाराची ओळख करून देणारे क्लासेस मुंबईतल्या वांद्रेमध्ये आहे. या क्लाससाठी दिवसाला 500 रुपयेही मोजायला महिला तयार असतात.

  मसाला भांगडा हा पंजाबी नृत्य प्रकारावर आधारित आहे. हा नृत्य प्रकार सर्व वयोगटातील लोकांना आणि जे आपली फिटनेस पातळी वाढवू इच्छितात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. मसाला भांगड्याच्या एका डान्स सेशनमध्ये ५०० कॅलरीज घटवता येऊ शकतात, असे फिटनेस ट्रेनर रिद्धी गुप्ताने सांगितले. तर मसाला भांगडामुळे माझ्या शरीराची ठेवण होण्यास मदत झाली. माझा स्टेमिना वाढला, असे मत क्लासमध्ये आलेल्या सारीका या महिलेने व्यक्त केले. जर तुम्हालाही एक्सरसाईज आणि त्यासोबतच भांगडा करायचा आहे मग हा पर्याय जबरदस्त आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.