Advertisement

ताकाचे फायदे वाचाल तर कोल्ड्रिंक विसराल!

तहान लागली की आपण कोल्ड्रिंक पितो. पण त्यामुळे आपली तहान भागण्याएवजी अधिक वाढते. पण ताक पिण्याचे फायदे वाचाल तर आम्हाला खात्री आहे तुम्ही कोल्ड्रिंक विसराल...

ताकाचे फायदे वाचाल तर कोल्ड्रिंक विसराल!
SHARES

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर चांगलेच हैराण असतात. अशा वातावरणात शरीरात उष्णता अधिक वाढते. म्हणून खाण्या-पिण्याकडेदेखील लक्ष देणं आवश्यक आहे. उष्णतादायी वातावरणात ताक हे फायदेशीर आहे. ताकाला भुतलावरील अमृत समजलं जातं. दुपारचं जेवून झालं की ताक प्यावं, असं आयुर्वेदात म्हटलं आहे. ताक हे अग्निदिपक, पाचक, वाफ, पित्त, कफ दोषांचं शमन करणारं आहेताक पिण्याचे हेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोतताक पिण्याचे हे फायदे वाचून तुम्ही जेवणात ताकाचा नक्की समावेश कराल याची आम्हाला खात्री आहे.



) ताकातील प्रोबियोटिक हा घटक पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो.

) ताकातील प्रोबियोटिक आणि व्हिटामिन सी हे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतात.

) ताकात कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

) ताकात सर्व प्रकारचे व्हिटामीन्स आणि मिनरल्स असल्यामुळे त्वचा सतेज राहते.

) ताकात पोटॅशिअम अधिक असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. 


) उन्हाळ्याच्या दिवसात ताक तुमच्या शरीरातील पाण्याची क्षमता भरून काढते.

मुळव्याधीमध्ये दररोज ताक सेवन करावेयामुळे मलप्रवृत्ती सुकर होऊन त्रास कमी होतो.

) स्थूलता कमी करण्यासाठी ताक उपयुक्त आहे

) लघवीचे दोषमुतखडा आदी आजारांवर ताक लाभदायी आहे.



ताकामुळे अनेक फायदे होतातपण त्यात अन्य औषधी गुणधर्म असलेली फळं किंवा भाज्या मिश्रित केल्या की ताकाची रोगनाशक शक्ती अधिक वाढतेत्यामुळे खाली दिल्यानुसार ताक प्राशन केल्यास अधिक फायदा होईल.

  • वात दोष

           - वात दोष असेल तर ताकात सेंधेलोण आणि सुंठ मिक्स करून प्यावं.

  • पित्त दोष

          - ताकात खडीसाखर मिक्स करून प्यावं

  • कफ दोष

         - ताकात सुंट, मिरी, पिंपरी आणि थोडं मीठ मिक्स करून प्यावं.




हेही वाचा - 

'या' ट्रिक्स वापरून काढा सफरचंदावरील मेण

अंडे का फंडा : अशी ओळखा बनावट अंडी





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा