संत्र्याचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

 Mumbai
संत्र्याचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का?

'संत्र' हे फळ आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण या फळाचे फायदेही बरेच आहेत. जाणून घेऊयात संत्र्याचे काही फायदे. 

* लहान मुलांना संत्र्याचा रस पाजल्याने त्यांचं शरीर मजबूत राहण्यास मदत होते आणि रक्त साफ होतं. तसेच हाडं मजबूत होतात.

* सर्दी आणि खोकला झाला असेल, तर थंडीमध्ये गरम पाण्यात ताजं आणि गर्मीमध्ये थंड पाण्यात टाकून संत्र्याचा रस प्यायल्याने फायदा होतो.

* संत्र्याची साल उन्हात सुकवून त्याची बारीक पूड करून घ्यावी आणि ही पावडर रोज दिवसातून १ चमचा घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* खूप तहान लागल्यास संत्र खावं. त्याने तहान कमी होते.

* थंडीच्या ऋतूत लहान मुलांना गोड संत्र्याचा रस प्यायला दिल्यास ते आजारापासून दूर राहतात.

* संत्र्याची साल सुकवून त्याची पावडर गुलाबी पाण्यामध्ये चेहऱ्याला लावल्याने मुरुमाचे डाग कमी होण्यास मदत होते.

* दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीला सकाळी रिकाम्या पोटी संत्र्याचा रस दिल्याने दारू पिण्याची इच्छा कमी होते.

* संत्र्याचा रस रोज पिल्याने शरीरातील रक्ताची कमी, डोळ्यांची जळजळ, हातापायांची जळजळ कमी होण्यास मदत होते.

* नवजात मुलाला संत्र्याचा रस पाजल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.

* रोज संत्र्याचा रस किंवा संत्र्याचं सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Loading Comments 

Related News from लाइफस्टाइल