पारंपरिक अभंगांना नवा साज

  मुंबई  -  

  मुंबई - शब्द ओळखीचे...पण स्वर आधुनिक बाजाचे...पारंपारिक अभंगांना कन्टेम्पररी फोक म्युझिकचा साज चढवला की मग सादर होते अभंग रिपोस्ट. गिरण गावातल्या  सुयोग गोसावी, अजय व्हावळ, स्वप्नील तर्फे, विजय आचार्य, पियुष आचार्य, दुश देव या सहा तरूणांच्या धडाडीचा आणि कल्पकतेचा अविष्कार. ज्याला संगीत प्रेमींनी भरभरून साथ दिलीय, अगदी डोक्यावर घेतलयं.

  अभंग गायनाचा नवा ढंग लोक स्वीकारतील की नाही ही शंका निराधार ठरवत केवळ दोन वर्षात या बँडनं 75 कार्यक्रमांची मजल गाठलीय. नुकत्याच धनत्रयोदशीच्या दिवशी दादरला झालेल्या सांज स्वरांची कार्यक्रमात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कलेला भरभरून दाद दिलीय.
   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.