पौष्टिक खा, आरोग्यदायी रहा!

  मुंबई  -  

  माटुंगा - पौष्टीक खा आणि आरोग्यदायी रहा, हा कानमंत्र माटुंग्याच्या रामनिवास रुईया महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आला. 'जीवरसायनशास्त्र, अन्न विज्ञान तसेच गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे "अॅपेटाइझ" हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

  या इव्हेंटचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या पदार्थांतून वेगळा पौष्टिक असा पदार्थ बनवायचा होता. या मेन्यूमध्ये 'व्हिट ग्रास पाणीपुरी, कच्च्या पपईच्या सारणाची दाबेली हे पदार्थ सगळ्यांच्याच पसंतीस उतरले. विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन चॉकलेट, व्हेजिटेबल, सलाड असे एक ना अनेक चविष्ट खाद्यपदार्थ बनवले. त्याचा इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा आस्वाद घेतला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.