Advertisement

'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा!


'पुस्तकांचं उद्यान...' या, बसा आणि वाचा!
SHARES

द्यान म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ती हिरवी गार झाडं, रंगीबीरंगी फुलं, व्यायामाचं साहित्य आणि घसरगुंडीवर खेळणारी  लहान मुलं. पण परळमध्ये मात्र उद्यानात पुस्तकचं पुस्तकं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना यापुढे फिरायला किंवा खेळायलाच नाही तर अगदी पुस्तकं वाचायला देखील उद्यानात जाता येणार आहे.



पुस्तकांचं उद्यान

हवेशीर वातावरणात पुस्तकं वाचायचा कुणाला नाही आवडणार ? हाच विचार करून परळ भागात चक्क 'पुस्तकांचे उद्यान' सुरू करण्यात आलं. मुंबई पहिल्यांदाच अशा प्रकारचं उद्यान उभारण्यात आलं आहे. वाचन संस्कृती टिकून राहावी तसंच नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हाच 'पुस्तकाचे उद्यान' उभारण्यामागचा हेतू आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू करण्यात आलंय. अनेक वर्ष या उद्यानाची जागा पडून होती. या जागेचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हावा या उद्देशानं अजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हे उद्यान सुरू झालंय.



पुस्तकांचा खजिना

आत्मचरित्र, नाट्यसंपदा, काव्यसंग्रह, बालसाहित्य अशा प्रकारातली अनेक पुस्तकं या उद्यानात वाचनासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक पुस्तकं विषयानुसार त्या त्या लॉकरमध्ये ठेवण्यात आली आहेत. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडीची पुस्तकं इथं वाचायला मिळणार आहेत.



'वाचाल तर वाचाल'

उद्यानात एकावेळी साधारण ५० ते ६० जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऊन-पाऊस यापासून पुस्तकाचे रक्षण व्हावे यासाठी लॉकर व्यवस्था आणि देखभालीसाठी सुरक्षा रक्षक आहेत. उद्यानात अनेक सामाजीक संदेश देखील देण्यात आले आहेत. 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देणारे प्रबोधनकार ठाकरे, 'रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल' असा संदेश देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समर्थ रामदास स्वामी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे वाचनाचे महत्त्व सांगणारे संदेश पाहायला मिळत आहेत.


कुठे

परळ परिसरात चाळी,  उंच टॉवर, पडक्या मिल्स आणि अनेक मोठी रुग्णालयं पहायला मिळतात. आता याच परळमध्ये पुस्तकांचं उद्यान देखील उभारलं आहे. परळ स्टेशनच्या पूर्वेला भारत माता थिएटर आहे. त्याच्यासमोरच आयटीसी ग्रँड हॉटेल आहे. त्याच्या पुढे हे उद्यान आहे. 



हेही वाचा

'इथं' आहे मोफत वाचनालय


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा