Advertisement

तुम्हाला पुस्तक प्रकाशित करायचंय? मग 'किताब' आहे ना!


तुम्हाला पुस्तक प्रकाशित करायचंय? मग 'किताब' आहे ना!
SHARES

एखादं छानसं पुस्तक लिहिण्याचा तुमचा विचार आहे? किंवा तुम्ही पुस्तकाची टिप्पणं लिहून ठेवली आहेत, पण एक मोठा प्रश्न तुम्हाला पडला आहे की, आता रफमध्ये लिहिलेलं पुस्तक पब्लिश कोण करणार? कारण पुस्तक पब्लिश करायचं म्हणजे सोपं नाही. पेपर वर्कपासून ते औपचारीक प्रकाशनापर्यंत सर्व व्याप तुम्हालाच करावा लागतो. पण तुमची या सर्व व्यापातून सुटका करून देण्यासाठी 'किताब'नं पुढाकार घेतला आहे.


किताब म्हणजे काय?

पुस्तक प्रकाशन करण्याच्या प्रक्रियेतून तुम्हाला स्वत:ची सुटका करून घ्यायची असेल, तर किताबच्या संपर्कात राहा. तुम्ही एखादं रफ पुस्तक घेऊन त्यांच्याकडे गेलात, तर ते पुस्तक पब्लिश करणं ही त्यांची जबाबदारी असते. पुस्तक प्रकाशन, पुस्तकाचं डिझाईन, पुस्तक छापणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं या सर्वाची जबाबदारी 'किताब'तर्फे उचलली जाते.

एवढंच नाही, तर प्रिंट आणि डिजिटल या दोन्ही पद्धतीनं ते पुस्तकाचं प्रकाशन करतात. किताबनं त्यांच्या वेबसाईटवर इंग्रजी आणि काही युरोपियन भाषांच्या पुस्तकांची कॉपी विक्रीसाठी ठेवली आहे. येत्या काळात मोठ्या आणि नामवंत बुकस्टोअर्ससोबत ते टाय-अप करणार आहेत. जेणेकरून ते त्यांच्या बुकस्टोअरमध्ये पुस्तकांच्या प्रति विक्रीसाठी उपलब्ध करून देतील.


पर्यावरणस्नेही 'किताब'

'किताब'तर्फे प्रकाशित करण्यात येणारी पुस्तकं पर्यावरणस्नेही आहेत. रिसायकल करून तयार केलेल्या पेपरचा वापर पुस्तक छापण्यासाठी केला जातो. पुढे या पुस्तकांची पानं पुन्हा रिसायकल देखील करता येतील. याशिवाय त्यात कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक वापरले जात नाही.

तुम्हाला देखील एखादं पुस्तक छापायचं असेल, तर तुम्ही किताबशी संपर्क करू शकता. किताबची स्वत:ची एक वेबसाईट आहे. या https://www.qitaab.com/ वेबसाईटच्या मदतीनं तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तुम्ही कुठल्या प्रकारचं पुस्तक छापणार आहात त्यानुसार पैसे आकारले जातील.



हेही वाचा

शिटी वाजवून पठ्ठ्यानं उंचावलं भारताचं नाव!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा