Advertisement

अननसाचे फायदे वाचाल तर रोज खाल


अननसाचे फायदे वाचाल तर रोज खाल
SHARES

अननस हे बाहेरून कडक पण आतून रसरशीत फळ आहे. चवीला आबंट-गोड असणारं अननस तसं फार कमीच खाल्लं जातं. ज्युस, फ्रुट सलाडमध्ये किंवा फ्रुट केकमध्ये अननस खाल्ला जातोपण विशेष कुणी अननस आणून खात नाही. मात्र, अननस खाण्याचे फायदे वाचून तुम्ही रोज अननस खाल याची खात्री आहे.


इम्युनिटी वाढते

अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एक रसायन असतं. यामध्ये अँटी-इनफ्लमेटरी आणि फायब्रीनोलिटिक तत्व असते. जे इम्युनिटी वाढवण्यास फायदेशीर ठरते.


हाडांची मजबूती

अननस हाडांसाठी फायदेशीर आहेकारण यामध्ये मॅगनीज असते. मॅगनीज एक असे पोषकत्व आहे जे हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. याव्यतिरिक्त ब्रोमेलेनचे अँटी इन्फ्लेमटरी तत्व अर्थराइटिसारख्या गंभीर समस्या दूर करण्याचे काम करते.


डायबिटीजसाठी चांगले

गोड फळ असले तरी अननसमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स आणि कॅलरी खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे डायबटीजचे रुग्ण कसलीच काळजी न करता अननस खाऊ शकतात.


हृदयरोगापासून बचाव

अननसमध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे ऑक्सीडेशन होण्यापासून बचाव होतो आणि हृदय रोगाची शक्यता कमी होते. अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचे रसायन असते. त्यामुळे धमन्यांमध्ये रक्त जमा होत नाही.   


पचनशक्ती सुधारते

अननस फायबरचा चांगला स्त्रोत आहे. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये असणाऱ्या ब्रोमेलेनमुळे पोटाच्या अॅसिडला नियंत्रणात ठेवते. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.


६) ग्लोइंग स्किन

अननसाचे अँटीऑक्सीडेंट्स एजिंगचे लक्षण म्हणजेच सुरकुत्यांपासून दूर ठेवते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी त्वचेचा ग्लो वाढवते.


७) कॅन्सरची शक्यता कमी

अननस खाल्ल्यानं कॅन्सरची भिती दूर होऊ शकते. कारण यात कॅन्सरपासून बचाव करणारे तत्व उपलब्ध असतात. एका संशोधनातून समोर आलं आहे की, अननसामध्ये उपलब्ध ब्रोमेलेन तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सरपासून वाचवू शकते.



हेही वाचा

ओले बदाम खाण्याचे फायदे वाचाल, तर थक्क व्हाल!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा