इराणी बेकरीची जादू आजही कायम

  मुंबई  -  

  भायखळा - मावा केक, मसका खारी, आलू टोस्ट, जॅम रोल, लेमन टी ब्रेड, जाम कुकीज, पीनट बटर कुकीज, बनमस्का, खारी बिस्कीट... आणि गरमा गरम चाय ! थकले-भागलेल्यांचे, टाइमपास करू इच्छिणार्‍यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे वन अँड ओनली भायखाळामधलं इराणी रेस्टॉरंट अँड बेकरी...

  भायखाळामधल्या या इराणी हॉटेलचं नाव काढलं की, प्रत्येकाच्या स्मृती जाग्या होतात. मावा केक, मसका खारी, बनमस्का आणि गरमागरम चाय अशा अनेक इराणी पदार्थांची चव अजूनही तुमच्या जिभेवर रेंगाळत राहिल. हे इराणी हॉटेल हिंदी, मराठी अभिनेते, साहित्यिकांचा गप्पांचा खास अड्डा. आजही इथं गप्पांचा फड रंगतो.
  या बेकरीची रचना सजावट इराणी स्टाइलमध्येच आहे. संगमरवरी दगडाचा पांढरा पृष्ठभाग असलेलं सागवानी लाकडाचं टेबल. काळे पॉलिश चढवलेल्या सागवानी लाकडापासून बनवलेल्या चार खुर्च्या. प्रत्येक टेबलावर मिरी पावडर आणि मिठाचे दोन शेकर, पाण्यानं भरलेला जग आणि दोन-तीन ग्लास. अशा पद्धतीनं इराणी हॉटेलवाला गिर्‍हाइकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. 1910मध्ये ही बेकरी सुरू करण्यात आली. आजही याची जादू कायम आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.