स्टार कॉस्मेटिक्सचा 'स्टार न्यू ब्रँड' अवतार

लोअर परेल - पाच दशकांहून अधिक काळ सौंदर्य प्रसाधनाच्या दुनियेत अधिराज्य गाजवणाऱ्या 'स्टार कॉस्मेटिक्स'चा भव्यदिव्य सोहळा नुकताच दक्षिण मुंबईतल्या एका क्लबमध्ये पार पडला. यावेळी नव्या ब्रँड स्टारचे अनावरण देखील करण्यात आलं. फॅशन जगतातील प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी जुकर यांच्यासह, विक्रम गायकवाड, दीप नोहते, जसवंत ठाकरे, ओजस रजनी आणि क्लिंट फर्नांडीस आदी रंगभूषा आणि फॅशनविश्वातल्या दिग्गजांबरोबरच जाहिरात विश्वातलं नामांकित व्यक्तिमत्त्व भरत दाभोळकर, टीव्ही कलाकार  अचिंत कौर आणि पारुल गुलाटी आदी सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले.  या ग्लॅमरस कार्यक्रमाची रंगत  सेलिब्रेटी डिझायनर गैविन मिगुएल याच्या फॅशन शो ने अधिक वाढवली.

Loading Comments