एसएनडीटी विद्यापिठात पार पडला 66 वा दीक्षांत समारोह

 Churchgate
एसएनडीटी विद्यापिठात पार पडला 66 वा दीक्षांत समारोह
एसएनडीटी विद्यापिठात पार पडला 66 वा दीक्षांत समारोह
See all
Churchgate, Mumbai  -  

चर्चगेट - एसएनडीटी महिला विद्यापिठाचा 66 वा दीक्षांत समारोह चर्चगेट येथील लेडी शांताबाई पाटकर या सभागृहात पार पडला.

या वेळी विद्यापिठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी दीक्षांत अहवाल सादर केला. या समारंभात 11 हजार 844 विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या.

समारंभात 12 अभ्यासक्रमातील 179 पदवी आणि पदविकांचा समावेश होता. तर 47 विद्यार्थिनींना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. मुलींना मार्गदर्शन करताना माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, मुलींना सुरक्षित नव्हे तर स्व:रक्षित होण्याची गरज आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या या समारंभाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, माजी सरन्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Loading Comments