जोडीदार मज निर्व्यसनीच हवा !

चर्चगेट - व्हॅलेंटाइन डे चं औचित्य साधून महाराष्ट्र नशा बंदी मंडळाच्या वतीने निर्व्यसनी जोडीदार निवडा असं आवाहन करण्यात आलं. एवढंच नाही तर या वेळी एका जोडप्याची घोड्यावरुन वरात देखील काढण्यात आली. प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे व्यसन आहे. त्यामुळे जोडीदार निवडताना थोडा विचार करुन निवडा असं आवाहन नशाबंदी  मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विलास यांनी केलंय. नशा केल्यामुळे गुन्हे करण्याच्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे नशा करू नका आणि दुसऱ्यालाही करू देऊ नका असं आवाहन नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबेकर यांनी केले आहे. घरात कोणालाही व्यसन असेल तर याचा परिणाम कुटुंबाच्या प्रत्येकावरच होतो. त्यामुळे व्यसन करणं टाळा आणि सुखी संसार करा, असं आवाहन या वेळी करण्यात आले. 

Loading Comments