वडापाव खा, हजार-पाचशे खपवा

    मुंबई  -  

    घाटकोपर - वडापाव खा..आणि हजार पाचशे रुपये खपवा अशी ऑफर सध्या घाटकोपरमधील जागृतीनगरमध्ये सुरू आहे. जागृतीनगरमधील माणिकलाल रोडच्या कॉर्नरला श्री. स्वामी समर्थ आयुर्वेदीक वडापाव स्टॉल आहे. या स्टॉलवर 500 आणि हजार रुपयांच्या जून्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. संतोष वायदंडे हे या वडापाव स्टॉलचे मालक असून, मागील 14 वर्षांपासून ते वडापावचा स्टॉल चालवत आहेत. नोटा बदलायच्या असतील तर 25 डिसेंबर पर्यंत बदलून मिळतील असं त्यांनी सांगितलंय. एका वडापावची किंमत 12 रुपये आहे. पण नोटा बदलण्यासाठी तुम्हाला येते 500 रुपयांसाठी 10 वडापाव आणि 1000 रुपयांसाठी 20 वडापाव घेतले तरच सुट्टे पैसे मिळतील अशी अट आहे.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.