यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती

 Ghatkopar
यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती
यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती
यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती
यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती
यावर्षी स्वदेशी फटाक्यांची चलती
See all

घाटकोपर - यंदा बाजारात आलेल्या चिनी फटाक्यांवर बहिष्कार घालण्यात आल्याचं चित्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वदेशी फटाक्यांना मागणी आहे. लवंगी फटके, छोटा-मोठा पाऊस, सुरसुऱ्या, फुलबाज्या, भुईचक्र, चॉकलेट बॉम्ब, सुतळी बॉम्ब, रॉकेट आणि लक्ष्मी बॉम्ब या फटाक्यांची किंमत २० रुपयापासून ते ५०० रुपयापर्यंत आहे. चिनी फटाके हलक्या दर्जाचे असतात आणि या फटाक्यांमुळे लहान मुलांना धोका असल्यामुळे या फटाक्यांवर बहिष्कार घातला, असं सुदेश तिवारी या फटाके विक्रेत्यानं सांगितलं.

Loading Comments