लक्ष्मी-कुबेरपूजन

Pali Hill
लक्ष्मी-कुबेरपूजन
लक्ष्मी-कुबेरपूजन
See all
मुंबई  -  

मुंबई - अश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल, त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केलं जातं. यावर्षी रविवार 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.05 पासून रात्री 8.36 पर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करायचं आहे. यादिवशी घरासमोर रांगोळी काढली जाते. याविषयी पुराणात एक कथा आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरते आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते. जिथं स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असेल तिथे ती आकर्षित होते. तसंच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील, माणसं राहतात, तिथे वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी घरात सकारात्मक वातावरण असण्याला महत्त्व दिलं जातं. चांगल्या मार्गानं मिळवलेल्या आणि चांगल्या मार्गानं खर्च होणाऱ्या पैशालाच लक्ष्मी म्हणतात.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.