Advertisement

लज्जतदार आणि आरोग्यदायी


लज्जतदार आणि आरोग्यदायी
SHARES

अंधेरी - स्वादिष्ट, चटकदार खाद्यपदार्थ आणि पेय सर्वांनाच आवडतात. मात्र ज्यूस, सूप आणि सलाडचे नाव ऐकताच सगळे नाक मुरडतात. मात्र हेच ज्यूस, सूप आणि सलाड खाण्यासाठी अंधेरीच्या लोखंडवालातल्या जॉगर्सपार्क येथील श्रीकृष्ण स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. इथे पुदिना सूप, दुधी, मुगडाळ, शेवग्याची शेंग, मकई, पालक, गाजर, टोमॅटो मिक्स व्हेज मंचाव, मुगमकाई, मिक्स प्रोटीन असे वेगवेगळे 20 प्रकारचे सूप मिळतात. तर कांदा, लसूण तेलाचा वापर न करता बनवलेल्या गरमा-गरम सूपचा स्वादच वेगळा असतो. इतकेच नाही तर सलाड आणि विविध प्रकारचे फ्रूट ज्यूसही इथे मिळतात. जॉगिंग करून परतणारे आणि तरुण-तरुणी इथे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा