Advertisement

'या' भाज्या कधीच कच्च्या खाऊ नका


'या' भाज्या कधीच कच्च्या खाऊ नका
SHARES

अनेकदा आपण डाएटच्या नावावर कच्च्या भाज्या खातो. मान्य की भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियमसह इतर पोषक तत्त्व असतात. पण या भाज्या तुम्ही कुठल्या पद्धतीनं खाता हे देखील महत्त्वाचं आहे. भाज्या शिजवून खाल्ल्यानं त्यातील पौष्टीक तत्व नष्ट होतात हे खरं आहे. पण हा नियम सर्वच भाज्यांना लागू होत नाही. काही ठराविक भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा तुम्ही शिजवून खाणं आवश्यक आहे. अशाच काही भाज्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) गाजर


गाजरमध्ये बीटा कॅरोटीन असतं. बीटा कॅरोटीन हे व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट होतं. गाजर शिजल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. यामुळे शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढते. त्वचेला पोषण मिळण्यासाठी हे आवश्यक असतं.


२) टोमॅटो


टोमॅटोमध्ये लाईकोपीन हे रसायन असतं. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि हार्टच्या समस्या उद्भवत नाहीत. टोमॅटो शिजल्यावर त्यातील टच सेल वॉल्स ब्रेक डाऊन होतात आणि लाईकोपीन हे रसायन अधिक प्रमाणात सोडतात. त्यामुळे हे शरीरात शोषले जातात.


३) ब्रोकली



ब्रोकली आणि कोबीत कठोर घटक असतात. त्यामुळे या भाज्या चांगल्याप्रकारे शिजवून खाणं आवश्यक आहे. कच्च्या खाल्ल्या तर पचायला जड जातात.


४) पालक


पालक अनेकदा सलाड म्हणून खाण्यात येतं. पण कच्चा पालक आरोग्यासाठी धोकादायक आहे. पालक शिजल्यावर त्यातील आयरन आणि मॅग्नेशियम तत्वांमध्ये वाढ होते.


५) मूग



बहुतांश वेळी मोड आलेले कच्चे मूग सलाडमध्ये टाकून खाल्ले जातात. पण तसं न करता मोड आलेले मूग शिजवून किंवा थोडसं तेल टाकून भाजून खावेत. कच्चे मूग खाल्ल्यानं शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.



हेही वाचा

अननसाचे फायदे वाचाल, तर रोज खाल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा