SHARE

मुंबईतील नाईट लाईफवरून चर्चांना उधाण आलेलं असताना शहरात पहिल्यांदाच 'नाईट बाजार'चं आयोजन करण्यात आलं आहे. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मुंबई शाॅपिंग फेस्टिव्हल (एफएसएफ)च्या माध्यमातून रात्रीच्या वेळेत या बाजाराचं आयोजन करण्यात आलं आहे. हा 'नाईट बाजार' शहरातील तीन ठिकाणी भरणार आहे.


कुठे, कधी आयोजन?

बीकेसीतील जिओ गार्डनमध्ये १३ ते १४ जानेवारी, मालाडमधील माईंडस्पेसमध्ये १९ ते २० जानेवारी आणि पवईत २६ ते २७ जानेवारी दरम्यान शहरातील एकूण तीन ठिकाणी हा 'नाईट बाजार' भरणार आहे. हा बाजार पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.


काय असेल?

या 'नाईट बाजार'मध्ये शाॅपिंग आणि मनोरंजनासोबत फूड ट्रक देखील असतील. मागच्या काही महिन्यांपासून मुंबईत रात्रीच्या वेळेतही दुकाने आणि मनोरंजनाची साधनं सुरू राहावीत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शिवाय दुकाने आणि आस्थापना कायद्यात संशोधन करून दुकाने २४x७ सुरू राहण्याची तजवीजही करण्यात आली आहे.


काय साध्य होणार?

महाराष्ट्र टुरिझन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (एमटीडीसी)ने दुबई आणि सिंगापूर शाॅपिंग फेस्टिव्हलप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या फेस्टिव्हलची योजना बनवली आहे. या शाॅपिंग फेस्टिव्हलच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच रोजगारनिर्मिती करता येईल, असा एमटीडीसीला विश्वास आहे.हेही वाचा-

काबूल ते मुंबई कार्गो सेवेचा व्यापाराला फायदा


संबंधित विषय
ताज्या बातम्या