Advertisement

हॅलोविन नाइट


SHARES

वांद्रे - पार्टी म्हटलं की नट्टापट्टा आलाच. कुणाला नाही आवडणार पार्टीत नटून जायला? पण मुंबईत अशीही एक पार्टी होती, जिथे नटून नाही तर भयावह वेशभूषा, विद्रुप चेहरे पाहायला मिळतात. ती पार्टी म्हणजे हॅलोविन पार्टी. वांद्रेतल्या द डेन पबमध्ये शनिवारी रात्री हॅलोविन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत विविध प्राण्यांचे मुखवटे घातलेली आणि मोठमोठे जबडे, सुळे, शिंगे वगैरे धारण करणारी लोक तुम्हाला पाहता आली असती. तसंच फँटम, बॅटमॅन वगैरे कॉमिकमध्ये दाखवतात तसले काळे सूट आणि भुताखेतांची किंवा वटवाघुळांची भयानक चित्रंही या हॅलोविनच्या पार्टीत दिसली.

हॅलोविन इतिहास हा प्राचीन ब्रिटन आणि आयरलँडमधील केल्टिक संस्कृतीशी जोडलेला आहे. चर्चकडून संतपद मिळवलेल्या किंवा न मिळवलेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच 'ऑल हॉलोज डे' किंवा 'होली डे' मानलं जाऊ लागलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा