'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात


  • 'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात
  • 'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात
  • 'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात
  • 'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात
  • 'पनाह 2016' ची धमाकेदार सुरुवात
SHARE

चर्नीरोड - के. पी. बी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक आंतर महाविद्यालयीन महोत्सव 'पनाह -2016' ला मंगळवारपासून सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या दिवशी वेगवेगळया विभागाच्या एकूण 18 स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ऑनलाइन गेम्स, क्रीडा, सांस्कृतिक, माध्यम, फाइनआर्ट्स, व्यवस्थापन यांचा समावेश होता. ऑनलाइन गेम्समध्ये काउंटर स्ट्राइक आणि फिफा या तंत्रज्ञानावर आधारित गेम्सने युवा वर्गाला सर्वात जास्त आकर्षित केलं. तर क्रीडाप्रेमींनी बुद्धीबळ आणि टेबल टेनिस स्पर्धेला चांगलीच गर्दी केली. सांस्कृतिक कार्यक्रम स्ट्रीट डान्स सारखे नवीन आणि लोकप्रिय नृत्य स्पर्धेत स्पर्धेकांनी आपल्या नृत्यांनी उपस्थित प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध करून टाकलं. तर माध्यम विभागाच्या शॉर्ट फिल्म आणि फोटोग्राफी इवेंट्समध्ये स्पर्धकांच्या कलागुणांनी तमाम विद्यार्थी वर्गाला आश्चर्यचकीत केलं. फाइनआर्ट्समध्ये फॅशन शो तसेच नखांवर पेंटिंग काढणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या रचनात्मक कलेचं दर्शन घडवून आणलं. एकूणच पहिल्या दिवसाचा झिंगाट बघून पुढचे काही दिवस तमाम युवा वर्ग हा सैराट होणार आहे यात मुळीच शंका नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या