वांद्रेतील रेस्टोबार ‘डोअर नंबर वन’

वांद्रे - म्युझिक एरीया, प्ले स्टेशन, छोटीशी लायब्ररी तेही एका रेस्टोबारमध्ये. ऐकायला थोडं विचित्र वाटतं आहे ना? पण हे खरे आहे. वांद्रेतल्या डोअर नंबर वन रेस्टोबारमध्ये तुम्हाला वेगळ्याच जगाची सफर घडेल. येथे छोटीशी लायब्ररी आहे. गेमिंगसाठी प्ले स्टेशन आहे. खाण्या-पिण्याचीही सोय आहे. खाण्यामध्ये इथले मेनू थोडे हटके आहेत. चकली आणि सांबार हे कॉम्बिनेशन तु्म्ही कधी पाहिलत का? पण चकली आणि सांबार ही हटके डिश तुम्हाला इथे चाखता येईल. तसंच तुम्हाला चिकन टिक्का, तंदूर रोटी आणि सेजवान सॉस असे कॉम्बिनेशन कुठल्याच हॉटेलमध्ये मिळणार नाही. कमीत कमी 150 आणि जास्तीत जास्त 300 रुपये इथल्या डिशेसची किंमत आहे. शिवाय बिल सादर करण्याची इथली पद्धत मजेशीर आहे. डोअर नंबर वन रेस्टोबारची हीच खासियत तरूणांना आकर्षित करते.

Loading Comments