कोणत्याही पत्रकाराला 'हे' छोटे उस्ताद देतील टक्कर


SHARE

भारतात न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर, न्यूजवेबसाईट आणि पत्रकारांची काही कमतरता नाही. त्याच त्याच न्यूज, टीव्ही चॅनल्सच्या टॉक शोमध्ये आरडा-ओरडा करणारे अँकर्स, न्यूज सागणारे तेच चेहरे हे सर्व तुमच्यासाठी कंटाळवाणं झालं आहे का? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. प्रेक्षकांसाठी जरी ही चांगली बातमी असली तरी पत्रकारांसाठी मात्र ही धोक्याची घंटा आहे, असंच म्हणावं लागेल. कारण आता बच्चे कंपनी देखील या न्यूज लाइनमध्ये उतरली आहे.


काय आहे ही संकल्पना?

चिलड्रन्स डेच्या निमित्तानं दिल्लीतल्या एका सामाजिक संस्थेनं स्क्रॅपी न्यूज सर्विस ही नवीन आणि हटके संकल्पना सुरू केली आहे. गोईंग टू स्कूल असं या संस्थेचं नाव आहे. स्कॅरी न्यूज सर्विसची पूर्ण जबाबदारी ही बच्चे कंपनी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे या बच्चे कंपनीचं ऑफिस स्क्रॅप म्हणजेच टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आले आहे. म्हणूनच त्यांचा ऑफिसला स्क्रॅपी न्यूज सर्विस हे नाव देण्यात आले आहे.
हे छोटे पत्रकार आहेत कोण?

न्यूज रिपोर्टिंगपासून ते अगदी अँकरपर्यंतच्या सर्वच जबाबदाऱ्या बच्चे कंपनीच्या खांद्यावर असणार आहेत. ७൦൦ उमेदवारांमधून या छोट्या पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही बच्चे कंपनी त्यांच्या पद्धतीनं अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणार आहेत.
स्क्रॅपी न्यूजच्या माध्यमातून अँकर धीरज (१൦) नागरिकांच्या समस्या जगासमोर मांडणार आहे. या समस्या कश्या सोडवता येतील यावर देखील चर्चा करणार आहे. तर ११ वर्षांची वॅलेस्का नागरिकांशी संवाद साधणार आहे. देशात कोणत्या बदलावाची गरज आहे, यासंदर्भात ती नागरिकांशी गप्पा मारणार आहे.


मुंबई, बंगळुरु आणि बिहारमधल्या १४ ठिकाणी स्क्रॅपी न्यूज सर्विस सुरू होणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल्स, प्लंबर, सुतार यांची मुलाखत छोटे उस्ताद घेताना दिसणार आहेत. त्यामुळे हे छोटे उस्ताद कशा प्रकारे देशातल्या नागरिकांच्या समस्या सोडवतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


हेही वाचा

'तिनं' भल्याभल्यांनाही विचार करायला लावलंय!

पाच वर्षांचा जीव..पण त्याचे स्टंट थरकाप उडवतात!


संबंधित विषय