सिडनहॅमच्या ब्रुहाहा अंतिममध्ये 20 महाविद्यालयं

  Churchgate
  सिडनहॅमच्या ब्रुहाहा अंतिममध्ये 20 महाविद्यालयं
  मुंबई  -  

  चर्चगेट - सिडनहॅम महविद्यालयाच्या प्राथमिक फेरीचा निकाल रविवारी लागला असून, अंतिम फेरीमध्ये एकूण 20 महाविद्यालयं दाखल झालीत. यंदा 44 महाविद्यालयं स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यातील वेगवेगळ्या इव्हेंटमधून 20 महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी 14 ते 16 डिसेंबर या दोन दिवसांत सिडनहॅमच्या प्रांगणात रंगणार आहे.

  या शिवाय फाइन आर्ट्स, पफॉर्मिंग आर्ट्स, स्पोर्ट्स इव्हेंट, लिटररी आर्ट्स, गेमिंग झोन अशा 5 विभागांचेही सामने रंगणार आहेत. या वेळी अभिनेत्री मानसी नाईक, रोहित राऊत, दिपाली सय्यद, बाजीराव होडगेही उपस्थित राहणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.