सणासुदीच्या खरेदीला सवलतींची झालर

 Pali Hill
सणासुदीच्या खरेदीला सवलतींची झालर
सणासुदीच्या खरेदीला सवलतींची झालर
सणासुदीच्या खरेदीला सवलतींची झालर
सणासुदीच्या खरेदीला सवलतींची झालर
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - सणासुदीला खरेदी करायची आपल्याकडे परंपराच आहे. त्यामुळे बाजारपेठाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींचा वर्षाव करतात. आता ऑनलाइन शॉपिंग कंपन्या आल्यापासून आल्यापासून चोखंदळ ग्राहकांसाठी किफायतशीर खरेदीचे अनेक पर्याय खुले झाले आहेत.

यंदा दसऱ्यासाठीही ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्या विविध उत्पादनं घेऊन आल्या. शॉपक्लूजवर 69 रुपयांपासून उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यात कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहसजावटीचं सामान आणि भेटवस्तूंचा समावेश आहे. तर ऑनलाइन शॉपिंग बाजारामधील आघाडीची कंपनी असलेल्या अॅमेझॉनवर दसऱ्यानिमित्त उत्पादनांवर 85 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.

तुम्हाला दसऱ्याला खरं सोनं लुटायचं असेल तर फ्लिपकार्ट हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. फ्लिपकार्टने दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी सवलतींचा पेटारा उघडला आहे. त्यात दागिने खरेदी करणाऱ्या महिलांना डोळ्यांसमोर ठेवून दागिने खरेदीवर 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन शॉपिंगला ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. याबाबत कफ परेड येथील आरती सप्रू म्हणाल्या, 'ऑनलाइन खरेदीच्या पर्यायामुळे प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करताना होणारी दगदग वाचते आहे. ट्रॅफिक, गर्दी, यापासून सुटका झाली आहे. तसेच ऑनलाइन खरेदीवर उत्तम सवलतही मिळते आहे.'

Loading Comments