Advertisement

कॉटनवर्ल्डच्या उपक्रमांतर्गत कल्की कोचलिनची शेतकऱ्यांना मदत


कॉटनवर्ल्डच्या उपक्रमांतर्गत कल्की कोचलिनची शेतकऱ्यांना मदत
SHARES

अभिनेत्री कल्की कोचलिनच्या हस्ते कॉटनवर्ल्डच्या 'हॅपी टी-शर्ट'चं नुकतंच अनावरण झालं. वांद्र्यातल्या कॉटनवर्ल्ड स्टोअरमध्ये हा अनावरण कार्यक्रम पार पडला. जर तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्यासोबत पण चांगलंच होतं, असा कल्कीचा विश्वास आहे. त्यामुळे कल्कीनं हॅपी टी-शर्टच्या उपक्रमाला पाठिंबा दिला. या वेळी तिच्यासोबत कॉटनवर्ल्डचे संचालक लाविन लेखराज उपस्थित होते.


हॅपी टी-शर्ट उपक्रम नक्की आहे काय?

कॉटनवर्ल्डचे हॅपी टी-शर्ट १൦൦ टक्के कापसापासून बनवलेले आहेत. हा कापूस विदर्भातल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 'हॅपी टी-शर्ट'च्या विक्रीतून येणारे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले जाणार आहेत. चेतना विकासच्या मदतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चेतना विकास भारतातील एक मोठी संस्था आहे. महाराष्ट्रातल्या १२൦ गावांमधल्या ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ही संस्था मदत करणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळणार आहे. यावेळी एका चांगल्या उपक्रमात सहभागी झाल्याचं समाधान कल्कीच्या चेहऱ्यावर दिसत होतं.


मला अभिमान वाटत आहे की मी एका चांगल्या उपक्रमासाठी हातभार लावला आहे. सेंद्रीय आणि नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्याला मी नेहमीच प्राधान्य देते. उदाहरणच द्यायचं झालं, तर मी केसांसाठी आणि त्वचेसाठी खोबरेल तेल वापरते. कॉटनवर्ल्डनं त्यांची हटके संकल्पना माझ्याशी शेअर केली तेव्हा मी या उपक्रमाला हातभार लावण्यास तात्काळ होकार दिला.

कल्की कोचलिन, अभिनेत्री


कल्की कोचलिननं कॉटनवर्ल्डच्या उपक्रमाला हातभार लावला याचा आनंद कॉटनवर्ल्डचे संचालक लाविन लेखराज यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. "मी कल्कीचा खूप आभारी आहे, की तिनं या कार्यक्रमाला हजेरी लावली. आम्हाला ही मोहीम खूप पुढे घेऊन जायची आहे. त्यामुळे आम्ही ग्राहक आणि कामगार या दोघांच्या बाजूनं विचार करत आहोत. आम्हाला यात नक्कीच यश मिळेल," असा विश्वास लाविन लेखराज यांनी व्यक्त केला.


कॉटनवर्ल्डच्या उपक्रमांतर्गत आम्ही वर्धा आणि नागपूरचा दौरा केला. या वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा एक-एक शब्द माझ्या अंगावर काटा आणत होता. अनेक कुटुंबातील शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या होत्या. माझ्यासाठी ते खरंच खूप धक्कादायक होतं.

कल्की कोचलिन, अभिनेत्री


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा