• लाला कॉलेजचा संकल्प महोत्सव
SHARE

महालक्ष्मी - येथील लाला लजपतराय कॉलेजमध्ये 15 आणि 16 फेब्रुवारीला स्त्री शक्तीला सलाम करणारा संकल्प महोत्सव आयोजित करण्यात आला. लाला कॉलेजच्या एनएसएस विभागाकडून हा महोत्सव गेली 2 वर्षे आयोजित करण्यात येतो. यामध्ये दक्षिण मुंबईतील अनेक कॉलेज सहभाग घेतात. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कलाकृतीतून स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवानिमित्त संपूर्ण कॉलेजमध्ये कर्तृत्ववान महिलांची माहिती देणारे फलक फोटो सहित लावले. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना महिला संरक्षण आणि सबलीकरण अशी ठेवण्यात आली. या दोन दिवसीय महोत्सवात कचऱ्यातून उपयोगी वस्तू बनवणे, टी- शर्ट पेंटिंग, चित्रकला अशा स्पर्धांबरोबरच व्याख्यान आणि चर्चासत्रे देखील आयोजित करून या विषयावर जनजागृती केली जाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या