• एलआयसीत नोकरीची सुवर्ण संधी
SHARE

परळ - एरव्ही पॉलिसी काढा म्हणून ग्राहकांच्या मागे लागणाऱ्या भारतीय जीवन विमा कंपनीने नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी परळ स्थानकाच्या पादचारी पुलावर फलक आणि स्टॉल उभारले होते.

'बेरोजगारांना रोजगाराची उत्तम संधी म्हणूनच नव्हे तर गृहिणी, विद्यार्थी, कर्मचारी, सेल्समन, शेअर ब्रोकर यांना आपले सर्व काम सांभाळून अर्धवेळ सल्लागार म्हणून भारतीय जीवन विमा या कंपनीत कार्य करता येईल', त्यासाठी शिक्षण मर्यादा बारावी उत्तीर्ण आणि 18 वर्ष पूर्ण अशी अट असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी 600 नागरिकांनी ही नोकरी मिळावी म्हणून अर्ज भरले असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी रितेश साळवे यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या