राज्य युवा पुरस्कार प्रदान सोहळा

Fort
राज्य युवा पुरस्कार प्रदान सोहळा
राज्य युवा पुरस्कार प्रदान सोहळा
राज्य युवा पुरस्कार प्रदान सोहळा
See all
मुंबई  -  

फोर्ट - महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे राज्य युवा पुरस्कार वितरण सोहळा झाला. बुधवारी सायंकाळी फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राज्यातील 48 चाळीस युवक- युवतींना हा पुरस्कार देण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार विजेत्यांना देण्यात आला. समाजात विविध भागात चांगली कामं करुन समाजातील तळागळातील लोकांची मदत आणि प्रबोधन करणाऱ्या युवकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

मागील दोन वर्ष हा पुरस्कार देण्यात आला नव्हता. पण, या वर्षी मागील दोन्ही वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्कारासाठी अनेक अर्ज आले होते, ज्यांचे काम फक्त वर्तमान पत्रात झळकत होते. अशा सर्व अर्जांची खात्री करुन जमिनीवर काम करणाऱ्या व्यक्तिंनाच हा पुरस्कार देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यामुळे विलंब झाला, पण योग्य उमेद्वारानेच हा सन्मान प्राप्त झाल्याचे समाधान आहे. या पुरस्कारांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, असं विनोद तावडे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात स्पष्ट केलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.