रुईया कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा

 Matunga
रुईया कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा
Matunga, Mumbai  -  

माटुंगा - मराठी भाषा दिनानिमित्त रुईया कॉलेजच्या सभागृहात सोमवारी 'साज मराठी' कार्यक्रम पार पडला. मराठी विभाग, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे या कार्यक्रमाचे आजोयन करण्यात आले होते. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. 

या वेळी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, कविताही सादर केल्या. त्याचबरोबर जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे समन्वयक कौस्तुभ जोशी यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दलचे भाष्य करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अगदी घाटमाथा, डोंगरदऱ्या, कोकणी, मालवणी, आदिवासी इत्यादी भाषा आणि संस्कृतीचे सादरीकरण केले. मराठी विभागातील शिल्पा नेवे, जनसंज्ञापन पत्रकारिता विभागाच्या अश्लेषा रांगणेकर आणि इतर शिक्षक वर्ग या कार्यक्रमात उपस्थित होते.

Loading Comments