फूड फेस्टिव्हलचं आयोजन

 Kings Circle
फूड फेस्टिव्हलचं आयोजन

किंग्ज सर्कल - महिला दिनाचे औचित्य साधून 5 मार्चला किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. संकल्प महिला औद्योगिक उत्पादक या संस्थेमार्फत हा फूड फेस्टिव्हल ठेवण्यात आला. या संस्थेच्या महिला उद्योजकांनी आपल्या घरगुती खाद्य पदार्थांचे स्टॉल्स येथे लावले होते.

या फेस्टिव्हलमध्ये उसळ, वडापाव, कांदापोहे, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा, कोकम सरबत इत्यादी खाद्यपदार्थ होते.  

गेली 8 वर्ष संकल्प ही संस्था कार्यरत आहे. या फूड फेस्टिव्हलला खवय्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Loading Comments