Advertisement

तळलेल्या तेलाचा इकोफ्रेंडली वापर, मॅकडॉनल्डची आयडियाची कल्पना


तळलेल्या तेलाचा इकोफ्रेंडली वापर, मॅकडॉनल्डची आयडियाची कल्पना
SHARES

आपल्या घरात आठवड्यातून एकदा तरी तळलेले पदार्थ होतात. भजी, पापड किंवा आणखी कुठले पदार्थ तळले की त्याचं तेल उरतं. पण या तेलाचं करायचं काय हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. तळणीचे तेल वापरून किती वापरणार? या तेलाचे कार्बनचे बारीक सूक्ष्म कण तसेच राहून जातात. हे तेल वारंवार वापरले तर त्यातील कण जळून जातात आणि पदार्थांला वास येतो. अखेर हे तेल फेकून दिलं जातं.



फक्त तुम्हालाच नाही तर मॅकडॉनल्ड सारख्या मोठ्या आणि नावाजलेल्या ब्रँडला देखील या समस्येचा सामना करावा लागतो. पण त्यांची समस्या आपल्यापेक्षा किती तरी पटीनं अधिक आहे. कारण आपल्या घरात प्रश्न असतो तो अर्ध्या-पाव लिटर तळणीच्या तेलाचा. पण मॅकडॉनल्डच्या प्रत्येक शाखेत हजारो लिटर तळणीचं तेल तयार होत असतं. फ्रेंच फ्राईज, आलू टिकी असे त्यांचे बरेच खाद्यपदार्थ तेलात तळलेले असतात. पण एवढं तळलेलं तेल फेकून देणं म्हणजे स्वत:चं नुकसान करून घेण्यासारखं आहे. पुन्हा वापरलं तर आरोग्याला धोका आहे. यावर आता मॅकडॉनल्डनं एक अफलातून उपाय शोधून काढला आहे.


मॅकडॉनल्डची आयडियाची कल्पना

या समस्येवर मात करण्यासाठी मॅकडॉनल्डला एक भन्नाट संकल्पना सुचली आहे. मॅकडॉनल्ड्स या सर्व तेलाचे रुपांतर जैविक इंधनात (बायो फ्युएल) करणार आहे. या इंधनाचा वापर करून मॅकडॉनल्डच्या सगळ्या गाड्या धावणार आहेत. मॅकडॉनल्डचे डायरेक्टर विक्रम ओगले यांनी हे नुकतच जाहीर केलं आहे


पेट्रोल-डिझेलला पर्याय

विक्रम ओगले यांनी हा निर्णय आता जरी जाहीर केला असला तरी एका वर्षांपूर्वीच कामाला सुरुवात झाली आहेतळणीच्या तेलाचे इंधनात रुपांतर करण्यासाठी मॅकडॉनल्डनं युनिकॉन बायो फ्युएल यांच्यासोबत हात मिळवणी केली आहेयानुसार मॅकडॉनल्डनं मुंबईतल्या ८५ शाखांमधून दर महिना ३५ हजार लिटर तळणीच्या तेलाचं इंधनात रुपांतर केलं आहे. एवढ्या तेलातून महिन्याला २४ लाख आणि वर्षाकाठी जवळजवळ ३ कोटी रुपयांची बचत मॅकडॉनल्डनं केली आहे. याशिवाय डिझेल आणि पेट्रोलला हे इंधन चांगला पर्याय आहे. डिझेल आणि पेट्रोलमुळे हवेत कार्बन सोडला जातो. पण या इंधनातून असा धोका उद्भवणार नाही


मुंबईतून पहिली सुरुवात

या संकल्पनेला मुंबईतून पहिली सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत मॅकडॉनल्डच्या ५० टक्के शाखांमध्ये तळणीच्या तेलापासून इंधन तयार केलं जातंलवकरच २७५ शांखांमध्ये ही संकल्पना राबवली जाणार आहे. तर येत्या चार वर्षांमध्ये जवळपास ५०० शाखांमध्ये ही संकल्पना राबवण्याचा मानस आहे



पर्यावरणासाठी मॅकडॉनल्ड्सचा पुढाकार

पर्यावरण रक्षणासाठी मॅकडॉनल्डनं घेतलेला निर्णय चांगला आहे. मॅकडॉनल्ड्सनं प्लास्टिक बंदीला देखील पाठिंबा दिला आहे. प्लास्टिक बंदी लागू होताच मॅकडॉनल्डनं कागदी स्ट्रॉ, प्लेट्स,ग्लास यांचा वापर करायला सुरुवात केली आहे.  फक्त एवढंच नाही तर आरोग्याच्या दृष्टीकोनातून मॅकडॉनल्डनं त्यांच्या मेन्यूमध्ये देखील बदल केले आहेत. त्यांच्या खाद्यपदार्थातील वापरण्यात येणारे तेल, मीठ यावर नियंत्रण आणलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी मॅकडॉनल्डनं उचलेलं पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅकडॉनल्डसारख्या इतर मोठ्या कंपन्यांनी देखील ही संकल्पना राबवायला आहे.



हेही वाचा : आता मेकडॉनल्डसुद्धा होणार आरोग्यदायी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा