Advertisement

मी अत्रे बोलतोय पुस्तकाचं प्रकाशन


मी अत्रे बोलतोय पुस्तकाचं प्रकाशन
SHARES

दादर - व्यास क्रिएशन्स प्रकाशित सदानंद जोशी लिखित आणि शिबानी जोशी संपादित मी अत्रे बोलतोय या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी झालं. दादरच्या अमर हिंद मंडळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं.
सदानंद जोशी यांनी आचार्य अत्रे हयात असतानाही या एकपात्री नाटकाचे अनेक प्रयोग केले आणि हे नाटक गाजवलंही. या नाटकाची आठवण म्हणून सदानंद जोशी यांच्या सूनबाई म्हणजे शिबानी जोशी यांनी हे नाटक पुस्तकाच्या स्वरुपात आणलं. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पण अत्रेंचे नातू राजेंद्र पै यांनी अत्रेंच्या या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासूनच्या आठवणी जागवत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, हा कार्यक्रम म्हणजे अत्रे आणि ठाकरे कुटुंबीयांचा कौटुंबिक कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात अत्रेय वृत्ती असणं ही काळाची गरज आहे. अत्रे-ठाकरे यांच्यातल्या राजकीय वादाचा दुष्परिणाम आमच्या बालपणावर कधीच झाला नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा