Advertisement

चहा, सामोसा, गव्हाच्या चपात्या भारतीय नाहीत!


चहा, सामोसा, गव्हाच्या चपात्या भारतीय नाहीत!
SHARES

सामोसा, जिलेबी आणि असे किती तरी पदार्थ भारतीय पदार्थ आहेत असं आतापर्यंत आपण मानत होतो. पण खरंतर हे पदार्थ भारतीय नसून त्यांची खरी सुरुवात परदेशात झाली आहे.

रोज दिवसभरात आपण प्रत्येकजण दिवसातून किती तरी वेळा चहा पितो. फ्रेश वाटावं म्हणून, झोप उडवी म्हणून, थकवा जावा म्हणून अशा कितीतरी गोष्टींवर चहा पिणं हेच एक सोल्युशन असतं. तसंच, सामोसा हाही एक असा पदार्थ आहे, जो गल्लोगल्ली सगळीकडेच मिळतो. असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही, ज्याने सामोसाची चव नाही चाखली. पण तुम्हाला माहीत आहे का, की हे पदार्थ विदेशी आहेत? 

पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्यांना आतापर्यंत आपण भारतीय समजत होतो पण त्याची मूळ सुरवात विदेशात झाली आहे...


सामोसा :



सामोसा हा असा पदार्थ आहे, जो प्रत्येकाने एकदा तरी खाल्लाच असेल! पार्टी, संध्याकाळच्या न्याहरीला सामोसा आवर्जून खाल्ला जातो. हाच सामोसा खरतरं १४ व्या शतकात मुघलांच्या बरोबर भारतात आला. आणि नंतर तो भारतीय पदार्थ म्हणून समजला जाऊ लागला. 'सामोसा' हे नाव फारसी 'Sanbosag' या शब्दापासून बनले आहे.


चहा :



दिवसातून १-२ नाही, तर अगदी ३-४ वेळा ही चहाचं सेवन केलं जातं. कित्येकांची दिवसाची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. भारताच्या उत्तर पूर्व भागात चहा जास्त पिकवला जातो. पण, चहा हे सुद्धा भारतीय पेय नाही. चहा इंग्रजांमुळे भारतात आला. आणि तेव्हापासून भारतात चहा एवढा लोकप्रिय झाला की दिवसाची सुरुवात ही चहापासूनच केली जाऊ लागली.


जिलेबी :



भारतात जिलेबीचे बरेच प्रकार मिळतात. उत्तर भारतात जिलेबीला 'इमरती'सुद्धा संबोधलं जातं. जिलेबी म्हटलं, की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. 'जिलेबी' हा अरबी आणि फारसी शब्द आहे. आणि फारसी योद्ध्यांनी जिलेबीला भारतात आणलं.


लोणचं :



लोणचं हा पदार्थ जेवणाच्या ताटात वाढलाच जातो. मोठ्या चवीने लोणचं खाल्लंही जातं. पोर्तुगाल लोक सुरुवातीला लोणच्यासाठी हळद आणि मीठाचा वापर करायचे. कालांतराने त्या पदार्थाला 'लोणचं' या नावाने प्रसिद्धी मिळाली.


टोमॅटो :



अशी कोणतीच भाजी नाही, ज्यात आपण टोमॅटोचा वापर करत नाही. प्रत्येक भाजीत किंवा डाळीत आपण टोमॅटो थोड्याफार प्रमाणात टाकतोच. पण टोमॅटोसुद्धा भारतीय प्रकार नाही. टोमॅटोला १६व्या शतकाच्या आसपास स्पेनमधून भारतात आणलं गेलं होतं.


गुलाब जाम :




गुलाबजाम कोणाला आवडत नाहीत? पण गुलाम जाम हा गोड पदार्थ ही भारतीय नाहीये. हा पदार्थ खऱ्या अर्थी पर्शियन आहे. फारसी आणि भूमध्य सागरी प्रदेशात हा पदार्थ 'लुकमात-अल-कदी' या नावाने प्रसिद्ध आहे.


गव्हाची चपाती :



आपल्या इथे जास्त करून गव्हाच्याच चपात्या बनवल्या जातात. पण खूप वर्षांपूर्वी असं नव्हतं. प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये गव्हाचं नावही नाहीये. पण बार्ली, सत्तू, चाळणी अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. असं मानलं जातं, की गव्हाच्या चपातीची सुरुवात डच आणि मिस्त्रमध्ये झाली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा