Advertisement

शॉपिंगची क्रेझ आहे? मग मुंबईत येतोय महा शॉपिंग फेस्टिव्हल!

जानेवारीमध्ये मुंबईत पहिल्यांदाच शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंं आहे. 'टूरिस्ट स्पॉट' म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी इथं अनेक कार्यक्रम देखील यानिमित्ताने ठेवण्यात येणार आहेत.

शॉपिंगची क्रेझ आहे? मग मुंबईत येतोय महा शॉपिंग फेस्टिव्हल!
SHARES

शॉपिंग करायला कुणाला नाही आवडत? महिलांचा तर शॉपिंग म्हणजे आवडीचा कार्यक्रम! खरंतर कमी किंमतीत जास्त खरेदी करता येते, तेव्हाच शॉपिंगची खरी मजा येते. मग मुंबईकरांनो तयार व्हा! नव्या वर्षात तुम्हाला स्वस्तात मस्त अशी शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारीमध्ये मुंबईत पहिल्यांदाच शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलंं आहे. 'टूरिस्ट स्पॉट' म्हणून ओळखऱ्या जाणाऱ्या ठिकाणी म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी इथं अनेक कार्यक्रम देखील यानिमित्ताने ठेवण्यात येणार आहेत.


शॉपिंग फेस्टिव्हलची खासियत

१२ ते ३൦ जानेवारीदरम्यान शॉपिंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शॉपिंग महोत्सवात तुम्हाला शॉपिंग, हॉटेलिंग अशा अनेक सेवांसाठी मोठी सूट मिळणार आहे. महोत्सव काळात हॉटेलिंग, लॉजिंग, फूड, शॉपिंग, ट्रॅव्हलिंग अशा विविध सेवांमध्ये सवलती देण्यास मुंबईतील संबंधित विविध संस्था आणि संघटनांनी तयारी दर्शवली आहे.


शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये वेगळं काय?

या फेस्टिव्हलमध्ये फक्त शॉपिंगच नाही, तर इतरही अनेक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. म्युझिकल शो देखील आयोजित करण्यात आला आहे. यात अनेक नामवंत गायक सहभागी होणार आहेत. यासोबतच गाजलेले चित्रपट कमी किंमतीत पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यामुळे हा फेस्टिव्हल फक्त पर्यटकांसाठीच नाही, तर सामान्य मुंबईकरांसाठी देखील एक पर्वणी ठरणार आहे!


शॉपिंग फेस्टिव्हलचा हेतू

दुबई फेस्टिव्हलच्या धर्तीवर संपूर्ण एमएमआर परिसरात अर्थात मुंबई मेट्रो रिजनमध्ये मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. विदेशातील पर्यटकांचा मुंबईतील ओघ वाढवण्याच्या दृष्टीनं हा शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील पर्यटानाला, तसंच इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी या दृष्टीनं हा महोत्सव महत्त्वाचा ठरेल. पर्यटन विभाग आणि एमटीडीसीनं यासाठी पुढाकार घेतला आहे.हेही वाचा

चल रंग दे... मुंबईचं रुपडं पालटणार


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा