खा, प्या आणि मज्जा करा !

Mumbai  -  

काळाघोडा - मुंबईत 4 फेब्रुवारीपासून काळा घोडा फेस्टिव्हलची धूम सुरू झाली आहे. सतत धावणारी, धकाधकीचे जीवन जगणारी मुंबई या फेस्टिव्हलच्या निमित्ताने थोडी विसावते. या फेस्टिव्हलमध्ये आर्ट, म्युझिक, कल्चर, पेंटिंग, स्टेज परफॉर्मन्सेस अशा अनेक गोष्टींचा आनंद मुंबईकरांना घेता येणार आहे.

'इट, शॉप अँड लव्ह' ही या वेळेच्या फेस्टिव्हलची थीम आहे. तसेच या वेळी मुंबईचा इतिहास उलगडून दाखवण्यात आला आहे. पेंटिंग आणि कलाकृतीद्वारे मुंबईच्या इतिहासाचे वर्णन करण्यात आले आहे. पारंपरिक कला अविष्कारांबरोबर स्ट्रीट शोसुद्धा काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे.

http://www.kalaghodaassociation.com या वेबसाइटवर जाऊन काळा घोडा फेस्टिव्हल संदर्भात सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.

Loading Comments