Advertisement

तुम्हाला थ्रीडी सेल्फी काढायचाय? मग या कॅफेला भेट द्या!


तुम्हाला थ्रीडी सेल्फी काढायचाय? मग या कॅफेला भेट द्या!
SHARES

तंत्रज्ञानाला काही तोड नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे थ्रीडी कॅफे. कॉफीवर मशिनद्वारे सेल्फी फोटो छापून मिळतो हे सर्वांनाच माहीत असेल. पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुम्ही तुमची हुबेहुब थ्रीडी सेल्फी इमेज देखील बनवून घेऊ शकता!


थ्रीडी कॅफेची खासियत

थ्रीडी कॅफे ही एक नवीन संकल्पना आहे. या कॅफेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनच्या वस्तू तयार करता येणार आहेत. एका थ्रीडी जेलचा वापर करून तुम्ही छोट्या छोट्या वस्तू साकारू शकता. या थ्रीडी सॉफ्टवेअरच्या मदतीनं तुम्ही सेल्फी इमेज, छोटी रींग किंवा शोभेची एखादी वस्तू बनवू शकता!



कसा बनतो थ्रीडी सेल्फी?

पहिलं तुम्हाला मशिनद्वारे स्कॅन केलं जातं. सर्व अँगलनं स्कॅन केल्यानंतर तुमचं डिजीटल रीडिंग केलं जातं. त्यानंतर मशिनच्या मदतीनं प्लॅस्टिक मटेरियलमध्ये तुमची थ्रीडी सेल्फी इमेज तयार होते. थ्रीडी सेल्फी बनवण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. जवळपास २ तासांचा कालावधी तुमच्याकडे असला पाहिजे. त्यामुळे ऑर्डर देऊन दोन तासांनंतर तुम्ही तुमचं पार्सल घेऊन जाऊ शकता. लहान थ्रीडी इमेजची किंमत १५०० रुपयांपासून सुरू होते. सीएडी या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन फॉरमॅटचा वापर करून डिझाईन केली जातेत्यानंतर प्रिंटरच्या मदतीन थ्रीडी इमेज तयार केली जाते.  




तुम्ही स्वत:देखील तिथं जाऊन थ्रीडी जेल पेनच्या मदतीनं वेगवेगळ्या थ्रीडी इमेज ट्राय करू शकता. पण काळजी करू नका. यात अवघड असं काहीच नाही. या स्टुडिओत तुम्हाला थ्रीडी जेल पेनचा वापर करण्यापासून ते थ्रीडी सेल्फी इमेज बनवण्यापर्यंत सगळं मार्गदर्शन केलं जातं. याशिवाय थ्रीडी प्रिंटर कसा काम करतो? थ्रीडी डिझाईन कसं करायचंयाच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.


कुठे आहे कॅफे?

तुम्हाला देखील एखादा थ्रीडी सेल्फी काढायचा असेल, तर विले पार्लेला जाऊ शकता. १४, सेवा सदन, डिजे रोड, विले पार्ले (.) या ठिकाणी भेट द्या आणि काढा थ्रीडी सेल्फी!



हेही वाचा

मिसळ महोत्सवाला सांस्कृतिक तडका!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा