सिडनहॅम महाविद्यालयात ‘मुरंजन’चा जल्लोष

चर्चगेट - सिडनहॅम महाविद्यालयात मुरंजन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1931 पासूनची परंपरा असलेल्या ड्रॅमेटीकल सोसायटीच्या वतीन या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचा ‘मुंबई लाइव्ह’ माध्यम प्रायोजक आहे. यंदा ‘मुरंजन’मध्ये नाट्य क्षेत्राशी संबंधित विविध कला प्रहसन, एकांकीका तसेच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, नाटक अभिवाचन यांसारखे एकूण 11 विविध इव्हेंट झाले. एकंदर पाहता नाटकांची खरी मजा या महोत्सवात दिसून येत होती. अगदी मुंबई, ठाणे आणि महाड अशा विविध ठिकाणांहून महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. खरंतर तरुणांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी ‘मुरंजन’ हे उत्तम व्यासपीठ ठरलं.

Loading Comments