नरकचतुर्दशीचं महत्त्व

Pali Hill
नरकचतुर्दशीचं महत्त्व
नरकचतुर्दशीचं महत्त्व
See all
मुंबई  -  

अश्र्विन कृष्ण चंद्रोदयाला असेल त्यादिवशी नरकचतुर्दशी असते. यावर्षी शनिवार 29 ऑक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आहे. या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेलं आहे. थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेला सुरकुत्या पडत असतात. तसेच थंडीत त्वचा कोरडी पडते. यावर अभ्यंगस्नान हा उत्तम उपाय आहे. शरीराला सुगंध उटणे आणि तेल लाऊन मालिश केल्यानंतर गरम पाण्यानं स्नान करणं यालाच अभ्यंगस्नान म्हणतात. अभ्यंगस्नान केल्यानं स्नायू बळकट होतात आणि त्वचा तेजस्वी होते. नरकचतुर्दशीसंबधी एक पौराणिक कथा आहे. अश्र्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्रजेला त्रास देणाऱ्या नरकासुर राक्षसाला ठार मारलं. मरणाच्यावेळी त्यानं श्रीकृष्णापाशी एक इच्छा प्रगट केली. आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करेल त्याला नरकाची पिडा होऊ नये. तसंच माझा हा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा. त्यावर भगवान श्रींकृष्णाने तथास्तू म्हटलं. त्यामुळं नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली. यादिवशी दीपदानही केलं जातं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.