Advertisement

‘कर्तव्यमेळा 2017’ ची वरळीकरांना पर्वणी


SHARES

वरळी - रंगीबिरंगी कापडी बँग्स, आकर्षक पर्सेस, वेगवेगळ्या प्रकारची ऑर्नामेंट्स, कुर्ते हा नजारा आहे कर्तव्यमेळा 2017 महोत्सवामधला. टाकाऊपासून टिकाऊ बनवून त्याची विक्री कशी करता येईल याचे हे चांगले उदाहरणच. ससमीरा इन्स्टिट्यूट येथे शुक्रवारी आयोजित केलेला हा महोत्सव वरळीकरांसाठी पर्वणीच ठरला. या महोत्सवाचे उद्घाटन नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडचे भास्कर योगेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी बनवलेल्या वस्तूंना एक योग्य भाव मिळवा, या हेतूने दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाच्या निमित्ताने ससमीरा इन्स्टिट्यूट मध्ये 27 सामाजिक संस्थांनी नावे नोंदवली.

महोत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तू या इकोफ्रेंडली असतात. अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न असलेल्या महिला बचत गटातील महिलांच्या वस्तूंना या ठिकाणी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक मुंबई लाइव्ह होते. वरळीकरांनीही महोत्सवाला चांगला प्रतिसाद दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा