• सरकारी नियमांना पोलिसांची केराची टोपली!
  • सरकारी नियमांना पोलिसांची केराची टोपली!
SHARE

माहिम - राज्य सरकारचे निर्णय हे सर्वच सरकारी कार्यालयाला बंधनकारक असतात पण मुंबई पोलिसांना हे नियम लागू नाही का? असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय. दोन दिवसांपूर्वी सरकारने जीआर काढून कार्यालयात पूजा, देवाचे फोटो यासा मज्जाव केला होता. मात्र जीआरच्या दोन दिवसांनंतर माहीम येथील सागरी पोलीस ठाण्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेचे सगळ्यांना पद्धतशीरपणे आमंत्रण देखील देण्यात आले होत. याबाबत पोलिसांना विचारले असता कोणतीही पूजा नाही, 26 जानेवारी निमित्त आम्ही हा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे असे त्यांनी सांगितले. मग या आमंत्रणाचं काय? आणि प्रसादाचा घाट कशाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या