Advertisement

स्माईल डे : हसाल तर जास्त जगाल


स्माईल डे : हसाल तर जास्त जगाल
SHARES

ऑक्टोबरचा पहिला शुक्रवार स्माईल डे म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताण-तणाव आणि दगदग यासर्वात आपण मनमोकळेपणानं हसणं विसरून गेलोय. याचाच परिणाम शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. 

आजच्या आयुष्यात हसणं फार आवश्यक आहे. दिखावा म्हणून न हसता मनापासून हसलं पाहिजे. कारण हसण्याचे अनेक फायदे असतात एक म्हणजे शारीरिक आणि दुसरा मानसिक. हसणे हे अनेक रोगांवर देखील गुणकारी औषध आहे. व्यस्त दिनक्रमात आनंदाचे दोन क्षण काढणे आरोग्याच्या दृष्टीनं हितकारी ठरते. आज आम्ही तुम्हाला हसण्याचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे सागंणार आहोत. जेणेकरून तुम्ही खळखळून हसाल.


१) मूड खराब असेल किंवा टेंशन असेल तर अनेक जणं खात सुटतात. खास करून गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा निर्माण होते. पण तुमच्या या सवयीवर हसण्यामुळे नियंत्रण ठेवता येऊ शकते. मनमुराद आणि मोकळेपणानं हसल्यानं शरीरात एंडोफ्रिस हार्मोन सक्रिय होतात. यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते.  

२) चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणं आणि रक्तसंचार वाढवण्यासाठी हसण्याची भूमिका महत्त्वाची आहे. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. 

३) आनंदी राहिल्यानं शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली अधिक सक्षम होते. 


४) अनेकांना एकटं राहण्याची सवय असते. एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते चाळीस ते पन्नास टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र बनवा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

५) दहा मिनिटं व्यायाम केल्यानं जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिटं हसणं पुरेसं ठरतं, हे एका संशोधनात सिद्ध झालं आहे. 

६) हसत राहिल्यानं शरीरातील उर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता वाढते. 


७) हसत राहिल्यानं व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात. त्या व्यक्तीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो. हसतमुख आणि नेहमी उत्साही राहणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात. 

८) हसल्यानं तणावातून तुमची मुक्ती होते. परिस्थिती कितीही तणापूर्ण असो. पण तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे हार्मोन्सची सक्रियता वाढते.

९) बॉडी पेन असणाऱ्यांना त्यापासून सुटका मिळते. असह्य दुखण्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर लाफिंग थेरपीचा वापर करतात.


१०) बॉडी पेन असणाऱ्यांना त्यापासून सुटका मिळते. असह्य दुखण्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर लाफिंग थेरपीचा वापर करतात.


११) हसण्यामुळे शरीरातील सार्‍या नसा खेचल्या जातात. यामुळे शरीरातील रिलॅक्स पॉईंट अ‍ॅक्टिव्ह होतात. हसल्यानंतर तुम्हांला आपोआपच रिलॅक्स वाटेल.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा