कला प्रेमींसाठी काळाघोडा येथे चित्र प्रदर्शन

 Kala Ghoda
कला प्रेमींसाठी काळाघोडा येथे चित्र प्रदर्शन

फोर्ट - येथील काळाघोडा नजीक असणाऱ्या अॅडोर हाऊसच्या मैदानात चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कोलकाता येथील स्वाती राॅय या चित्रकाराने हे प्रदर्शन भरवले आहे. 6 ते 12 मार्चच्या कालावधीत हे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनात एकूण 19 चित्र ठेवण्यात अाली अाहेत. माणसाचे विविध पैलू या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

"वैयक्तिकरित्या हे माझे तिसरे प्रदर्शन आहे. तसेच या चित्रांतून जर योग्य प्रतिसाद मिळाला तर मी नक्कीच ट्रस्ट अथवा समाजसेवी संस्थेला मदत करण्याचा प्रयत्न करेन," असे स्वाती रॉय यांनी सांगितले.

Loading Comments