चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन

Doctor Annie Besant Road
चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन
चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन
चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन
चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन
चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन
See all
मुंबई  -  

वरळी - वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनात 32 चित्रांचा समावेश आहे. 20 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंतची चित्रं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

निसर्ग हा विषय असल्यामुळे मीना यांच्या चित्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची निसर्गाची रुपं इथे पहायला मिळतात. भारतातल्या विविध भागात निसर्गाची असलेली विविध रुपं या चित्र प्रदर्शनात पहायला मिळतात. मीना दुबे यांचं हे सोलो प्रदर्शन आहे.

मीना यांची भोपाळ, महाराष्ट्र, न्यूझीलंड आदी ठिकाणी आजपर्यंत अनेक प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत. लहानपणापासून पाहिलेल्या निसर्गावर आधारीत त्या चित्रं रेखाटतात. मीना यांनी विविध प्रकारच्या रंगांचा वापर करुन चित्रे रेखाटली आहेत. ऑइल पेंटिंग, अक्रायलिक (Acrylic), ऑईल अॅण्ड वॉटर कलर ऑन कॅनवास (Oil and water colors on canvas), पेपर अॅण्ड मटेरिअल (paper and other materials) या साहित्य सामग्रीतून मीना चित्र रेखाटतात.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.