नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन

 Nehru Centre
नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन
See all
Nehru Centre, Mumbai  -  

वरळी - नेहरू सेंटरमध्ये 'मॉक पॉवर' या चित्रप्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. 'मॉक पॉवर' हा माधवी जोशी आणि चित्रकार जितेंद्र थोरात यांचा ग्रुप शो आहे. या चित्रप्रदर्शनात 36 वेगवेगळे पेंटिंग लावण्यात आले आहेत. चित्रकार माधवी जोशी यांच्या कलाकृती, संस्कृती वैभव, इतिहास आणि वैदिक काळापासून असणाऱ्या धार्मिक रुढी परंपरांचे महत्त्व अधोरेखित करतात. शंक, चक्र, गदा, डमरू, त्रिशूळ अशी चिन्हे वापरून शिव शक्ती त्याचप्रमाणे कासव, मासा, सूर्य, चंद्र आणि दशावतार यावर आधारीत कलाकृती सादर करण्यात आल्या.

मानवी जीवनातील मूल्ये, संस्कृती, निष्ठा, परंपरा आणि त्यांचे महत्त्व या संकल्पेनेभोवतीच ही चित्रमालिका फिरत असल्याचे जाणवते. चित्रकार जितेंद्र थोरात यांनी आपल्या कलाकृतीमध्ये घोड्यांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटल्या आहेत. त्यातून त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न शिताफीने केलेला आपल्याला पाहायला मिळेल. हे प्रदर्शन 20 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार असून रसिक प्रेक्षकांना हे प्रदर्शन विनामुल्य पाहता येणार आहे.

Loading Comments