• पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
  • पैठणी फेस्टिव्हल
SHARE

शिवाजी पार्क - शिवाजी पार्कमधील स्काउट हॉलमध्ये पैठणी साडीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन भरलंय. प्रदर्शनात 250 हून अधिक पैठणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

पैठणी हा मराठी महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आणि दिवाळी अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे या प्रदर्शनाला महिला अधिक भेट देत आहेत. साडीवर मॅचिन बॅगा कानातली यांना एक ट्रेडिशनल टच देऊन या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महिलांसोबतच मुलीही या प्रदर्शनाला भेट देताना दिसून येत आहेत. प्रदर्शनादरम्यान ओरिजनल पैठणी कशी ओळखायची यासाठी एक फ्री सेमीनार घेण्यात येणार आहे. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या पैठणी साडी येवला, संभाजीनगरमधील कारागीरांनी येथे विक्रीसाठी ठेवल्या आहेत, हे प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट आहेत. यामध्ये 7500 रुपयांपासून 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंतच्या पैठण्यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या